डहाळेगाव येथे एरंडीच्या बिया खाल्यामुळे पाच बालकांना विषबाधा
घनसावंगी प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील डहाळेगाव येथे एरंडीच्या बिया खाल्यामुळे विषबाधा झालेल्या पाच बालकांना उपचरासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घनसावंगी तालुक्यातील डहाळेगाव येथे ही घटना घडली . बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बाहेर खेळत असलेल्या स्वरा अमोल जाधव वय अडीच वर्षे , अनुष्का अमोल जाधव वय सहा वर्षे , अनुष्का दिगंबर मस्के वय पाच वर्षे , रोषनी बाबासाहेब मस्के वय चार वर्षे आणि तेजस्विनी बाबासाहेब मस्के वय सहा वर्षे या बहीनींनी एरंडीच्या बिया खाल्या थोड्याच वेळात त्यांना उलट्याचा त्रास सुरू झाल्याने गावातील सरपंच भाऊराव धोंडीबा मुके यांनी तातडीने या पाचही मुलींना जालन्यातील शासकीय सामान्य रूग्णालयात रेफर करण्यात आले .
परंतु पाचही मुलींची तब्येत चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी शहरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले असून पाच ही मुलांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात होते परंतु पाच ही मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना शेवटी औरंगाबाद घाटी पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे