बंगलेवाडी तांडा येथे उद्यापासून अंखड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
कुंभार पिंपळगाव /कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील बंगलेवाडी तांडा येथे दि.7 आगस्ट ते 14 आगस्ट दरम्यान अंखड हरिनाम सप्ताह तथा संगीत रामायण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये दररोज सकाळी 4 ते 6 काकडा आरती,7 ते 8 विष्णू सहस्त्र नाम, 11 ते 2 गाथा भजन, 2 ते 5 रामायण,6 ते 7 हरिपाठ,रात्री 9 ते 11 हरिकिर्तन होईल.
दि.7 आगस्ट शनिवार रोजी,ह.भ.प.शिवाजी महाराज घोन्सीकर,दि.8 रविवार ह.भ.प. नाना महाराज गोफणे,दि.9 सोमवार ह.भ.प.बापूराव महाराज चारठाणा,दि.10 मंगळवार ह.भ.प.शारदाताई मापारी, दि.11 बुधवार रोजी ह.भ.प.दत्ता महाराज आनंदे,दि.12 गुरूवार रोजी ह.भ.प.लक्ष्मण महाराज मासेगावकर,दि.13 शुक्रवार रोजी ह.भ.प.परमेश्वर महाराज धुळे, यांचे हरिकिर्तन होईल.तर दि.14 आगस्ट शनिवार रोजी सकाळी 9 ते 11 ह.भ.प.पंढरीनाथ महाराज भाकड यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या किर्तन श्रवण व महाप्रसादाचा आवश्य लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.