घनसावंगी तालुकाजालना क्राईम
अवैधरित्या दारूची विक्री करणारा अटकेत
कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथील एका ढाब्यावर सुरु असलेल्या दारुच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 1,140 रूपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक सोमनाथ नरके यांच्या फिर्यादीवरून संशयित सुनील लक्ष्मण नाडे(रा.शिवनगाव) यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हरिश्चंद्र हे करीत आहेत.