कुंभार पिंपळगाव येथील गाव अंतर्गत रस्ते व अंडरग्राऊंड नाल्या करण्यासाठी ग्राम विकास युवा मंच च्या वतीने पालकमंत्री यांना निवेदन सादर.

कुंभार पिंपळगाव/ कुलदीप पवार
कुंभार पिंपळगाव येथील वाढती लोकसंख्या व लोकवस्ती यांच्यामुळे या गावाचे झपाट्याने शहरीकरण होत आहे.या मुळे गावाचा विस्तार होत असताना घरातील सांडपाणी जाण्यासाठी काही भागात नाल्यांची व्यवस्था नाही व ते सांडपाणी रस्त्यावर येत आहे.त्यामुळे काही रस्ते चिखलमय होत असताना या रस्त्यावरून चालणे देखील अवघड झाले आहे.गावांतील कुंभार खिडकी ते सरस्वती भुवन महाविद्यालय टि पाॅइंट कडे जाणारा रस्त्याची तर अत्यंत दुरावस्था झालेली आहे.त्यातच परीसरातील दोन्ही बाजूंनी वसाहत असल्याने नागरीकांना नाल्यांची व्यवस्था नाही.त्यांचे सांडपाणी जाण्यासाठी नालीकरणाची व्यवस्था नसल्यामुळे त्यांचे सांडपाणी हे रस्त्यावर येत आहे.त्यातच हा गाव हद्द रस्ता असल्याने तो अंबड – पाथरी हायवे ला जोडल्या गेल्याने या रस्त्याने नेहमी वर्दळ होत आहे.त्यातच हा रस्ता शाळा महाविद्यालय कडे जात असल्याने या रस्त्यावरून पालक, विद्यार्थी यांना शाळा, महाविद्यालय व इतर कामांसाठी जात असताना नेहमी तारेवरची कसरत करावी लागते.तसेच गावातील कुंभार खिडकी ते जुनी जांब पांदी, सरस्वती भुवन महाविद्यालय ते कुंभार खिडकी मार्गे साठे नगर अरगडे गव्हाण टि पाॅइंट, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाराणा प्रताप चौक या रस्त्यांचे दुरुस्ती करणासह गावातील प्रत्येक गल्लीबोळात अंडरग्राऊंड नाल्यांची व्यवस्था करुन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी ग्राम विकास युवा मंच च्या वतीने मा.ना.राजेशभैय्या टोपे (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जालना ) यांना निवेदन देवून करण्यात आली.या वेळी त्यांनी सरस्वती भुवन ते कुंभार खिडकी दरम्यान रस्ता व नाली आठ ते दहा दिवसांत याचे काम सुरू करण्यात येईल असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.या निवेदनावर उमेश बोटे, सुरेश कंटुले, प्रशांत बुरसे, भागवत राऊत, दिनेश दाड, अंकुश कंटुले, वैभव कुलकर्णी, महारुद्र गबाळे, महावीर व्यवहारे,अनिल चिलवंत, धनंजय कंटुले,भरत राऊत यांच्या सह अनेकांच्या सह्या आहेत.