जालना जिल्हादिवाळी अंक २०२१

सत्ता ही कुणाच्या बापाची जहागीरदारी नाही, वडेट्टीवार

जालना प्रतिनिधी

images (60)
images (60)

ओबिसींमुळे मंत्री झालो असून मंत्रीपद ही काही बापाची खाजगी जहागीरदारी नाही. त्यामुळे ओबीसीसाठी मंत्रीपद खपले तरी चालेल असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी परखड मत त्यांनी जालन्यात व्यक्त केले.

अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील मंडल स्मारकावर मंडल आयोग लागु दिनानिमित्त शनिवारी (७) रोजी अभिवादन व सामाजिक न्याय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.ओबीसी जनगणनेसाठी राज्य सरकारने तत्कालीन व आताच्या सरकारने आठ वेळा प्रस्ताव सादर केला. मात्र केंद्राने हे आठ ही प्रस्ताव नाकारल्याने आत्ता हाच प्रस्ताव राज्य सरकार कडून मंजूर करून चाळीस हजार राजकीय आरक्षित जागा ह्या ओबीसी साठीच राखीव ठेवणार असल्याचे स्पष्ट मत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रमुख पाहुणे माजी मंत्री आमदार महादेव जानकर,आमदार राजेश राठोड, माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे,माजी आ नारायण मुंडे, सुशिला मोराळे, माजी आ रामराम वडकुते तसेच अरुण खरमाटे, बाबुराव सतकार, नारायण चाळगे, प्रा.सत्संग मुंडे, दिपक बोराडे, आदीची प्रमुख उपस्थिती होती.  पुढे बोलताना  विजय वडेट्टीवार म्हणाले की,सत्ता ही कुणाच्या बापाची जहागिरी नाही.केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात की राज्य सरकार बनवण्यासाठी आम्ही वेटिंग वर आहोत.त्यास प्रतिउत्तर देतानाते म्हणाले की आम्ही काय ऑक्सिजन वर आहोत काय? असा टोला त्यांनी नारायण राणे यांना लगावला. मंत्रीपद आज आहे तर उदया नाही सत्तेशी आमची बांधलकी नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पूढे मंत्री वडेट्टीवार म्हणाले की, माजी ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यावर समजले कि त्यांच्यावर होणारा अन्याय त्याच्या डोळ्यातील अश्रूतून दिसत असून हा ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट होवुन ओबीसी च्या दोन भावात दोन जातीत जातीयवादी भांडणे लावल्या जात आहेत. आता आम्ही ओबीसी समाज एकोप्याने लढुन सत्यनारायण महापुजा ही आम्हीच करणार व खारीक खोबरे ही आमची लेकरे खाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता शिवसेना सत्तेत आली तर मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा नाही आणि भाजपा व काँग्रेस पक्ष सत्तेत आले तरी ओबीसी चा मुख्यमंत्री होत नसल्याने परखड मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.   राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाने ओबीसींची जातनिहाय जनगणना होण्यासाठी ठराव करावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!