मंठा : सर्वसामान्य लोकांशी भावनिक नाते जपणारी शिवसेना- विनोद घोसाळकर
परतूर -मंठा मतदार संघात शिवसेनेला पोषक वातावरण – माजी मंत्री अर्जुनराव खोतकर
मंठा/ रमेश देशपांडे : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यापासून देशातच नव्हे तर जगावर कोरोना महामारीचे संकट आले, सर्व काही बंद असताना लोकांच्या मदतीसाठी शिवसैनिक उभा राहिला. शिवसेनेचे सर्व सामान्य लोकांशी भावनिक असे नाते आहे त्यांचा विश्वास फक्त शिवसेनेवरच असल्याचे शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी मंठा येथे सांगितले. येथील सरस्वती मंगल कार्यालयात रविवार ता. 8 रोजी शिवसेना पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याला माजीमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार संजय जाधव, आमदार अंबादास दानवे, माजी आमदार शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख ए.जे.पाटील बोराडे, अंकुशराव अवचार, मोहन अग्रवाल, पंडीतराव भुतेकर भाऊसाहेब घुगे, माधवराव कदम, बाबासाहेब तेलगड, बेबीताई पावशे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना श्री घोसाळकर म्हणाले की, राज्यावर अनेक संकटे आली कोकणात चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी लोकांना मदत केली, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, शिवसैनिकांनी कानाकोपऱ्यातून मदत पाठवली, सर्वसामान्य लोकांच्या मदतीला शिवसैनिक धावून जातो.
परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेचा भगवा झंजावात पाहायला मिळाला. मतदार संघातील जनतेने जिल्हाप्रमुख बोराडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी माजीमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर काम करणारा सच्चा कार्यकर्ता आहे. येणाऱ्या काळात परतूर मंठा मतदार संघातील जनता त्यांना आमदार म्हणून निवडून दिल्याशिवाय राहणार नाहीत. मागील पस्तीस ते चाळीस वर्षापासून ते पक्षाचे एकनिष्ठेने काम करतात त्यांना कामाचा कधी कंटाळा येत नाही, शिवसेना लोकांच्या सेवेत कधी कमी पडत नाही या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, विम्याची प्रश्न , रस्त्यांचे प्रश्न असतील ते सोडवायला आम्ही कधी कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली. याप्रसंगी खासदार संजय जाधव म्हणाले की, जालना जिल्ह्यात शिवसेना सातत्याने आघाडीवर आहे हा जिल्हा शिवसेनेचा जिल्हा म्हणून या महाराष्ट्रात वेगळी ओळख असून जिल्हाप्रमुख ए जे बोराडे आणि आम्ही अनेक वर्षापासून संघटनेत काम करतो त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले पाहिजे, आम्ही त्यांच्यासोबत तन-मन-धनाने सोबत आहोत, मागील नगरपंचायत निवडणुकीत लोणीकराना चारीमुंड्या चीत करून नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश मिळाले. आगामी निवडणूकही शिवसेना जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना ही सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारा पक्ष आहे असे सांगितले. आमदार अंबादास दानवे म्हणाले की, शिव संपर्क अभियानाच्या माध्यमातून गाव निहाय लोकांशी संपर्क आला लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पक्षाची संघटनात्मक बांधणी महत्त्वाचे असून शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे यापुढेही शिवसेनेचा झंझावात सुरूच राहणार असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगरपंचायतच्या निवडणुका जिंकण्यासाठी जबाबदारीने कामाला लागा असे आवाहन केले. जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी आपल्या भाषणात, 16 जुलै पासून राबविलेल्या शिव संपर्क अभियानाची रूपरेषा मांडली, कोरूना च्या महामारी मुळे संपर्क कमी झाल्यामुळे या माध्यमातून गणनिहाय बैठका घेतल्या. शिवसैनिकांनी आळस झटकून भगवा झंझावात उभा केला आहे या भागात संघर्ष आहे संघर्षातूनच शिवसेनेचा जन्म झाला असून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला या भागात निश्चितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांवर संधी दिली. यापुढेही प्रत्येक गाव वाडी तांड्यात हा झंझावात सुरू ठेवणार असून शिवसेनेचा झंझावातामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे नगरसेवक विष्णुपंत घोडके यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेचे जे के कूरेशी व उबेद भाईजी यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर कार्यकर्त्यांनी व मुस्लीम बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला. परतूर तालुक्यातील इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मंठा तालुकाप्रमुख अजय अवचार, परतुर तालुका प्रमुख अशोक आघाव, जालना तालुका प्रमुख हरिभाऊ पोहेकर, नगराध्यक्ष नितीन राठोड, माजी सभापती संतोष वरकड, प्रल्हादराव बोराडे, सुरेश सरोदे, श्रीरंगराव खरात, युवासेना तालुकाप्रमुख दिगंबर बोराडे, जिल्हा उपअधिकारी दीपक बोराडे, महादेव वाघमारे, तुळशीराम कोहिरे, हरिभाऊ चव्हाण, जि प सदस्य संजय राठोड, पंचायत समिती सदस्य मधुकर काकडे, बाबाराव राठोड, उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर जाधव, संजय नागरे, ज्ञानेश्वर सरकटे, अरुण उफाड, नगरसेवक प्रदीप बोराडे, अचितराव बोराडे, अरुण वाघमारे, इल्यास कुरेशी, नीरज सोमानी, जे के कुरेशी, महिला आघाडीच्या गयाताई पवार, विभाग प्रमुख बबन शेळके, विष्णुपंत खराबे, संतोष वरकड, अनिरुद्ध काकडे, दासोपंत खरात, पांडुरंग वैद्य, किरण सूर्यवंशी, वजीर पठाण, अशोक घारे, संदीप वायाळ, नाना बोराडे, संदीप बोराडे, आकाश मोरे, विष्णू बहाड, भागवत चव्हाण, पप्पू दायमा, अशोक खंदारे, कैलास पोटे, रामेश्वर शिंदे, अशोक मुरकुटे, डॉ. उबाळे, परमेश्वर उबाळे ऑटोरिक्षा युनियनचे अनिल हिरे, बाबाभाई, शकील भाई, गजू खंदारे, गणेश घोडके, डॉ. संतोष पवार, शिरू पवार, भगवानराव नागरे, कृष्णा वरणकर, महादेव खरात, गंगाराम गवळी, अशोक अवचार, शरद मोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शाहीर सुरेश जाधव यांचा छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन चरित्रावर पोवाडा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य सदाशिव कमळकर यांनी केले.
परतूर मंठा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद असून जिल्हाप्रमुख ए जे पाटील बोराडे यांच्या पाठीशी ताकद निर्माण करा. आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना विधानसभेत पाठविण्यासाठी तन-मन-धनाने मदत करणार
खासदार संजय जाधव
शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करणे आवश्यक असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करून सर्व स्थानिक स्वराज्य संस्था शिवसेनेच्या ताब्यात आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करावेत –
आमदार अंबादास दानवे