जालना जिल्हा

जालन्यातील डी मार्ट नगरपालिकेने केले सील

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशान्वये नगर पालिका , पोलीस कर्मचारी पथकाचि कारवाई

न्यूज जालना- जालना शहरालगत असलेले डिमार्ट मॉल हे रविवार ८ ऑगस्ट रोजी सील करण्यात आले . जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशान्वये नगर पालिका , पोलीस कर्मचारी आदींच्या पथकाने ही कारवाई केली . दरम्यान कायद्यांची अंमलबजावणी न करणाऱ्यांत चांगलीच खळबळ उडाली आहे .

images (60)
images (60)


कोरोना आणि डेल्टा प्लसचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाकडून गेल्या महिन्यात राज्यभरात निर्बंध लागू करण्यात चार दिवसांपुर्वीच या निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली असून तसे आदेशही जालना जिल्हाधिकारी यांनी काढले यात सोमवार ते शुक्रवार तसेच शनिवार दुपारी तीन वाजेपर्यंत आस्थापना सुरु ठेवण्यात परवानगी असून रविवारी अत्यावश्यक वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते .


असे असले तरी शहरालगत असलेले डिमार्ट हे अत्यावश्यक अस्थापनेत असल्यागत सुरू होते . शनिवार असो अथवा रविवार डिमार्टचे शटर उघडेच होते . याची माहिती पथकाला मिळताच डिमार्ट मॉल्स रविवार ८ ऑगस्ट रोजी सील करण्यात आले . जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी संदीपान सानप , तहसीलदार भुजबळ , मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी महेश शिंदे , कार्यालयीन अधिक्षक विजय फुलंब्रीकर , लोखंडे , सचिन मेहरा , राधेश्याम लोखंडे , पथकप्रमुख रायसिंग जाधव , शिक्षक हवाले , भागवत , राठोड , पोलीस कर्मचारी मुंढे , डोईफोडे , तराळ , डांगे आदींनी ही कारवाई पार पाडली .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!