घनसावंगी तालुका
असंघटित कामगार कॉंग्रेस घनसावंगी तालुका अध्यक्ष पदी साबेर शेख यांची निवड
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील साबेर शेख यांची असंघटित कामगार कॉंग्रेस घनसावंगी तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.हि निवड महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास गोरंटयाल यांच्या हस्ते साबेर शेख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जालना जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष राजाभाऊ देशमुख असंघटीत कामगार कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष शमशोद्दीन शेख जालना कॉंग्रेस शहराध्यक्ष शेख महेमुदभाई घनसावंगी विधानसभा तालुका अध्यक्ष रघुनाथ ताठे यांची प्रमुख उपस्थिती होती.