जालना क्राईम

घनसावंगी तालुक्यात ह्या ठिकाणी पकडला एक लाखाचा गुटखा व पानमसाला

घनसावंगी /नितीन तौर
राणीउच्चेगाव ता घनसावंगी येथे एका घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला गुटखा हा साठवुन ठेऊन गुटख्याची चोरटी विक्री करीत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मिळाली होती .

images (60)
images (60)

त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी छाप्याचे नियोजन करुन राणी उंचेगाव ता घनसावंगी येथील शाम सुभाष लोंढे याच्या घरात छापा मारला असता सदर ठिकाणी राजनिवास सुंगधी पान मसाला ( 720 ) पुडे व जाफराणी जर्दा चे ( 720 ) पुडे असा एकुण 1,08,000 / – रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा पानमसाला व तंबाखुमाल जप्त करण्यात आलेला आहे . आरोपी शाम सुभाष लोंढे रा.राणी उंचेगाव ता.घनसावंगी याच्या विरुध्द पोलीस ठाणे अंबड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अशी माहिती दि .१२ गुरूवार रोजी स्था.गु.शाखेच्या वतीने देण्यात आली आहे


सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख , अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग , पोहेकॉ संजय मगरे , पोना . देविदास भोजणे , फुलचंद गव्हाणे यांच्या वतीने करण्यात आली आहे .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!