जालना जिल्ह्यातील ह्या २४ ग्रामपंचायती कोरोनामुक्त स्पर्धेत अव्वल
कोरोनामुक्त ग्रामपंचायत स्पर्धेत जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायती अव्वल
स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायतींचा करणार गौरव
जालना दि. 14 :- जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात कोरोना-19 या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनामुक्त गाव, ग्रामपंचायतीची संकल्पना मांडली होती. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातुन तीन ग्रामपंचायतींना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यासाठी जिल्ह्यातुन एकुण 24 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील प्रत्येकी 3 ग्रामपंचायतीना दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते रोख पुरस्कार, सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींची नावे खालीलप्रमाणे
जालना तालुक्यातील दहिफळ ग्रामपचांयतीस प्रथम पुरस्कार, सोनदेव धारा द्वितीय तर तांदुळवाडी बुद्रुक या ग्रामपंचायतीस तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. बदनापुर तालुक्यातील अंबडगावला प्रथम, पाडळी द्वितीय तर मात्रेवाडीला तृतीय पुरस्कार
अंबड तालुक्यातील वडीगोद्री प्रथम, धनगरपिंप्री द्वितीय तर शहागडला तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड प्रथम, बाचेगाव द्वितीय तर नागोबाची वाडीला तृतीय पुरस्कार.
मंठा तालुक्यातील नायगाव प्रथम, वांजोळा द्वितीय तर विडोळी खुर्द तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहे.
परतुर तालुक्यातील खांडवीवाडी प्रथम, श्रीधरजवळा द्वितीय तर पांडेपोखरी तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहे.
भोकरदन तालुक्यातील आडगाव प्रथम, नळणी बुद्रुक समर्थनगर द्वितीय तर खामखेडा तृतीय पुरस्कार.
जाफ्राबादला तालुक्यातील खासगाव प्रथम, वरुड बुद्रुक द्वितीय तर माहोरा या ग्रामपंचायतीला तृतीय पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. विवेक खतगावकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.