जालना जिल्हा
जालना एटीएसचे पोहेकाँ. रशीद शेख यांना राष्ट्रपती पदक जाहीर
जालना प्रतिनिधी
जालना येथील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवालदार रशीद रहीम शेख यांना उत्कृष्ट पोलीस सेवेबद्दल यावर्षीचे राष्ट्रपती सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. याबद्दल उद्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांचा गौरव होणार आहे.
स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील उत्कृष्ट सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना राष्ट्रपती पदक देऊन गौरव करण्यात येणार आहे. राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या अधिकारी-कर्मचारी यांची आज यादी जाहीर करण्यात आली आहे. जालना येथे दहशतवादी विरोधी पथक कार्यरत असलेले रशीद रहीम शेख यांचा पदक जाहीर झालेल्या मध्ये समावेश आहे.
रशीद शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखा विशेष कृती दल यासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये उत्कृष्ट सेवा बजावली आहे.
राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल रशीद शेख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.