गुंज बु. येथे श्री शिव महापुराण कथा श्रावण मास महोत्सवास सुरुवात
कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील गुंज बु.येथे पवित्र श्रावण मासानिमित्त भगवान श्री सुंदरेश्वरांच्या कृपा आशीर्वादाने सुरू असणाऱा शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ श्रावणमास महोत्सव.
महाराजांनी कथे मधून भगवान शिव शंकराच्या पूजेचे महत्व प्रतिपादन केले तसेच तरुणांना पवित्र श्रावण महिन्यामध्ये गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालून परमार्थाकडे येण्याचे आव्हान केले तसेच व्यसनाला दूर टाकून परमार्थाकडे वाटचाल करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
तरी चालू असलेल्या शिव कथा ज्ञानयज्ञ महोत्सवामधे दैनंदिन धार्मिक कार्यक्रमांसह कथाकार ह.भ.प. प्रभाकर महाराज गरुड सावंगीकर यांच्या रसाळ वाणीतून कथा वाचन करण्यात येत आहे.यावेळी गावातील भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आहेत. तसेच कथेसाठी साथ संगीत करण्यासाठी गायक आकाश महाराज खाडे, कार्तिक शिलवंत, सोनू साखरे व तसेच टाळ मृदंग वादक म्हणून अंगद सांगुळे, विठ्ठल जाधव, भानुदास धनवडे, राजेभाऊ देशमुख व समस्त गावकरी मंडळीं सहकार्य करत आहेत.