जालना जिल्हा

मुस्तकीम हमदुले फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबीर
रक्तदान हेच श्रेष्ठदान- आ. कैलाश गोरंट्याल


जालना/प्रतिनिधी
मुस्तकीम हमदुले फाऊंडेशन व चाली ग्रुपतर्फे जूना जालना, स.भु. प्रशालेच्या पाठीमागील झमझम हॉस्पीटलमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात 111 दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान हेच श्रेष्ठदान असून, कोरोना काळात दिलेले रक्तदान रूग्णांना जीवदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार कैलाश गोरंट्याल यांनी केले.
शिबीराचे उद्घाटन जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलाश गोरंट्याल यांनी केले. अध्यक्षस्थानी मुस्तकीम हमदुले हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून काँग्रेसचे युवा नेता अक्षय गोरंट्याल,  काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमुद, मुफ़्ती फ़ारूक़ सहाब, मुफ़्ती सोहेल सहाब, जुनेद हमदुले, हाफ़िज़ ईरफान सहाब, न.प. उपाध्यक्ष सय्यद रहीम,हाजी अब्दुल हमीद सहाब,नगरसेवक महावीर ढक्का, नगरसेवक नजीब,नगरसेवक सय्यद अज़हर,नगरसेवक रमेश गौरक्षक, नगरसेवक फ़ारूक़ तूड़ीवाले, नगरसेवक जयंत भोसले, नगरसेवक विनोद रत्नपारखे, नगरसेवक अरुण मगरे, असलम पहेलवान कुरेशी,राजेन्द्र जी राख, माजी नगरसेवक बाला परदेसी,अहमद नूर सर, मोहन इंगले,राजेंद्र जाधव शाहनवाज़ कुरेशी, ऊबेत चाउस  आदि होते.
जमियत उलमा हिंद च्या पदाधिकार्‍यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नगरसेवक  शेख शकील  यांनी केले. तर आभार प्रदर्शन नगरसेवक मोहम्मद नजीब यांनी मानले. या  शिबीरासाठी शेख वसीम, अब्दुल सत्तार,शैबाज़ फौजी, आतिफ अंसारी, अयान, शेख आबेद, सोहेल चाउस , शेख हफ़ीज़, शेख अज़ीम, कल्लू आदिंनी परिश्रम घेतले.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!