ब्रेक द चेन :जालना जिल्हादंडाधिकारी यांचे नवीन आदेश.
जालना दि. 17 (ब्युरो) :- शासनाने कोरोना विषाणु (कोविड -19) रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण संदर्भातील ब्रेक द चेन सुधारीत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या असुन शासनाच्या आदेशानुसार जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन डॉ. विजय राठोड यांनी शासनाने निर्गमित केलेल्या आदेशातील मुद्दा क्र. 3 हा 3 (अ) म्हणुन दर्शविण्यात येऊन खालीलप्रमाणे सुधारित सुचना एका आदेशान्वये निर्गमित केल्या आहेत.
3) शॉपिंग मॉल्स :- अ) जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली असुन शॉपिंग मॉलमध्ये काम करणा-या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणा-या सर्व नागरीकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पुर्ण व दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहित ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.
ब) वय 18 वर्षे खालील वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरु न झाल्याने वय वर्षे 18 खालील वयोगटातील मुला, मुलींना प्रवेश करताना वयाचा पुरावा म्हणुन आधारकार्ड, आयकर विभागाने निर्गमित केलेले पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहणार असल्याचेही जिल्हादंडाधिकारी व अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जालना यांनी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.