कुंभार पिंपळगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत शाखा व्यवस्थापकाची नेमणूक करा-युवासेनेची मागणी
युवासैनिकांनी रिकाम्या खुर्चीला दिले निवेदन
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत मागील एक महिन्यांपासून शाखा व्यवस्थापक हे पद रिक्त असून सध्या खरीप हंगाम चालू आहे
पिककर्ज वाटप संथगतीने सुरू असून अद्यापपर्यंत एकही प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नाही.शाखा व्यवस्थापक अभावी हे पिककर्जाचे प्रस्ताव धूळखात पडलेले असून शेतकऱ्यांना पिककर्ज मिळणे कठीण बनले आहे.यासाठी युवा सेनेच्या वतिने आज दि. 17 मंगळवार रोजी रिकाम्या खुर्चीला निवेदन देण्यात आले.
येथील शाखेत शाखा व्यवस्थापकाची तात्काळ नेमणूक करून पिककर्जाची वाटपाची गती वाढविण्यात यावी नसता विभागीय कार्यालयासमोर युवासेनेच्या तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर संदिप कंटुले, धर्मराज आंधळे, उपतालुकाप्रमुख रवि शिंदे, गोपाल तांगडे, तपोवन काळे, माऊली उंबरे, नितिन आधुडे, कृष्णा शिंदे,शिवाजी माकोडे,शकुर शेख, अमोल काळे, अशोक दराडे, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.