मंठा शहर ते तहसील कडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमीचे झाड लावून निषेध
मंठा शहरपासून तहसीलकडे जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करा नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा
मंठा :रमेश देशपांडे
मंठा शहर ते जगदंबा देवी, तहसील कडे जाणारा रस्ता तात्काळ नुतनीकरण व दुरुस्ती करावा यासाठी,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी ह्या रस्त्यावरील खड्ड्यात बेसरमीचे झाड लावून निषेध व्यक्त केला.
सविस्तर वृत्त असे की,
मंठा शहराचे दैवत असलेले जगदंबा देवीच्या मंदिरात जाणारा रस्ता तसेच हा रस्ता तहसील, पंचायत समिती, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय,आयटीआय, रेनुका विद्यालय, या ठिकाणी जाणारा पुर्ण खराब झालेला. आहे, भक्तगण, विद्यार्थी, शेतकरी, कर्मचारी, तसेच सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
संदर्भित रस्ता ९ दिवसात हा रस्ता नुतनीकरण व दुरुस्ती करावा. नसता १० व्या दिवशी सार्वजनिक बांधकाम कार्यालया समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तर्फे तीव्र आंदोलन इशारा देण्यात आला यावेळी
मनसे मंठा तालुका अध्यक्ष गणेश बोराडे, मनविसे जिल्हा अध्यक्ष सुरेश घनवट, मनसे मंठा शहर अध्यक्ष प्रशांत काकडे तसेच महाराष्ट्र सैनिक मारोती लोमटे, कृष्णा वैद्य, कैलास शिंदे, शिवाजी चाळक,केशव सावंत, महादेव मिसाळ, बाळासाहेब खराबे, नारायणराव खराबे, विलास खराबे, रामेश्वर इंगळे, लक्ष्मण आन्ना टोम्पे, प्रदिप उगले, अंकुशराव मोरे यांच्या सह्या आहेत. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.