जैन संघटना व व्यापारी महासंघ मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न.
मंठा /रमेश देशपांडे :- मानवाच्या जीवनात तीन प्रकारचे दान सर्वश्रेष्ठ समजले जातात ज्यामध्ये अन्नदान, जीवनदान आणि रक्तदान त्या पैकी सर्वात महत्वाचे दान हे रक्तदान असून आपण या मुळे अपरिचित व आवश्यक त्या व्यक्तीस कुठल्याही परिस्थितीत रक्तदान जीवन दान मिळू शकते त्यामुळे रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याचे उदगार येथील प्रसिद्ध उद्योगपती, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती संजय छल्लाणी यांनी काढले.
ते बीजेएसचे संस्थापक श्री शांतिलालजी मुथ्था यांच्या वाढदिवासानिमित्य भारतीय जैन संघटना आणि व्यापारी महासंघ मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.या प्रसंगी बाल रुग्णालयाचे डॉ. तमखाने,दंत चिकित्सक डॉ. हांडगे, डॉ बागवे,डॉ. व्यंकटेश देशपांडे, देवगिरी बँकेचे व्यवस्थापक श्री शेळके, हिंगोली पीपल्स बँकेचे व्यवस्थापक वेलदोडे,राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार बाबूजी तिवारी, राजेश भुतेकर,रणजीत बोराडे, अमोल काला,महेश भांगडिया, सरपंच नारायण राठोड, प्रेमगोपाल कासट, कैलास भुतेकर,गोवर्धन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
छल्लाणी पुढे बोलताना म्हणाले की,रक्तदान हे सर्वश्रेष्ठ व निस्वार्थ दान आहे रक्तदान केल्याने कोणताही अशक्तपणा येत नाही उलट आपल्या रक्तामुळे एखाद्या रुग्णाचा प्राण वाचू शकतात या निस्वार्थ परोपकारी उपक्रमात भाग घेतल्याचे आत्मिक समाधान लाभते.आज देशात कोरोना सारखा संसर्गजन्य रोगामुळे अनेक ठिकाणी रक्ताची आवश्यकता भासत आहे अनेक ठिकाणी तुटवडा ही निर्माण झाल्याचे दृश्य दिसते त्यामुळे रक्तदात्यांनी विशेषतः तरुण वर्गाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.असे शेवटी बोलतांना सांगितले.
बस स्टँड समोरील तमखाने बाल रुग्णालय येथे घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण 39. एकोणचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीते करीता व्यापारी महासंघचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि छल्लानी मित्र मंडळाने भरभरून सहकार्य केले.
सतत पाऊस असल्याने शहरा बाहेरील रक्तदाते शिबीरास येऊ शकले नाहीत. म्हणून दुपारी 3 वाजे पर्यंतच शिबीर घ्यावे लागले रक्त संकलनासाठी जन कल्याण रक्तपेढी जालनाचे सहकार्य लाभले