जालना जिल्हा

नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची गोरसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी

images (60)
images (60)

जालना /प्रतिनिधी

नवी मुंबई विमानतळाला माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांचा नाव देण्यात यावे अशी मागणी गोरसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे आज दि.24 मंगळवार रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,स्व.वसंतराव नाईक हे महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहे.शहरात औद्योगिक विकास झपाट्याने व्हावा याकरिता भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. नवी मुंबई शहर वसविण्यास त्यांचा मोलाचा वाटा आहे.त्यांनी आर्थिक राजधानी मुंबई शहराचा कायापालट केला आहे.शेतकऱ्यांना पाणी वीज मुबलक प्रमाणात मिळावा म्हणून जायकवाडी, उजनी,अप्पर वैनगंगा,पेंच इत्यादी पाण्याचे प्रकल्प व कोराडी,पारस,परळी, खापरखेडा,पोकळी,व भुसावळ असे विद्युत प्रकल्प उभारलेले आहेत.देशात हरित क्रांती घडवून आणण्याचे काम वसंतराव नाईक यांनी केलेले असून त्यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देऊन कामगार शेतमजूर व सामान्य जनतेचे स्वप्न साकार करावे अशी मागणी गोरसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या वतीने मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास गोरसेनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.या निवेदनावर
जिल्हाध्यक्ष शाम राठोड,अमोल राठोड,विजय राठोड,अमोल राठोड,सचिन पवार, बाळू राठोड,ज्ञानेश्वर आढे,रामेश्वर राठोड,गोरख जाधव,सुरेश पवार,अर्जुन राठोड,राजु पवार, सचिन राठोड,आयुष राठोड, रितेश पवार,रोहित राठोड, अमोल आढे,विजय आढे,भाऊसाहेब चव्हाण,राहुल आढे
यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!