नारायण राणे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही -जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे
मंठा/ प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध कोंबडीचोर नारोबाने अपशब्द वापरून तमाम शिवसैनिकांचा अपमान केला असुन हा अपमान शिवसैनिक कदापिही सहन करणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नारोबाने माफी मागावी अन्यथा नारोबाला जिल्ह्यात फिरू देणार नाही असा सणसणीत इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांनी दिला. हिंदुरुदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे हे राज्यातील तमाम शिवसैनिकांचे दैवत आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विचारधारेवर राज्यात शिवसैनिक सर्वसामान्य लोकांची, जनसेवेची कामे करत असताना अल्प कालावधीतच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून नावलौकिक मिळवला. त्यामुळे नारोबाच्या पोटात पोटशूळ उठले असून मुख्यमंत्र्यांबद्दल बेजबाबदारपणाची बेताल वक्तव्य करीत आहेत, त्यांनी केलेल्या विधानामुळे तमाम शिवसैनिकांची मने दुखावली असून राज्यात भगवी त्सुनामी निर्माण झाली आहे, या भगव्या वादळात नारायण राणे बेचिराख झाल्याशिवाय राहणार नाही. राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर लोटांगण घालून माफी मागावी नसता शिवसेना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही असा इशारा दिला.
मंठा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना, युवासेनेने तीव्र शब्दात निषेध करून राणेच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. राणे यांनी शिवसैनिकांच्या दैवताचा अवमान केला त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसैनिकांनी केली. या जोडे मारो आंदोलनात माजी सभापती संतोष वरकड, बालासाहेबा, डिगांबर बोराडे, प्रदीप बोराडे, अचितराव बोराडे, इलियास कुरेशी, नीरज सोमानी, गजानन बोराडे, पप्पू दायमा, वजीर पठाण, भागवत चव्हाण, प्रल्हाद शिरसाट, किरण सूर्यवंशी, अशोक अवचार, शरद मोरे, सुशील घायाळ, उबेद बागवान, अशोक घारे, संदीप वायाळ यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासंबंधीचे निवेदन पोलीस स्टेशन मंठा येथे देण्यात आले, पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे यांनी हे निवेदन स्वीकारले.