मच्छिंद्र धस यांची सनदी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी —– विजय राठोड
मंठा/ प्रतिनिधी : मंठा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांनी समाजसेवक उद्धव पवार यांचे विरुद्ध पंचायत समिती कार्यालयातील एमआरईजीएस विभाग जळीत प्रकरणी खोटा गुन्हा दाखल केला होता या जळीत प्रकरणात उद्धव पवार यांचा संबंध नसल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे
त्यामुळे उद्धव पवार यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या गटविकास अधिकारी धस यांची सनदी अधिकाऱ्यां मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मंठा तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य विजय राठोड यांनी केली आहे. गटविकास अधिकारी धस यांनी आपल्या कार्यकाळातील भ्रष्टाचार लपविण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मार्फत एमआरईजीएस हा विभाग जाळण्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून येते, त्याचबरोबर पंचायत समितीच्या इतर विभागाचे सुद्धा ऑडिट करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व लोकप्रतिनिधींना अरेरावीची भाषा वापरणे, एमआरईजीएस अंतर्गत कामासाठी पैसे घेणे, अशा एक ना अनेक तक्रारी वरिष्ठ कार्यालयापर्यंत दाखल झाल्या होत्या,,अशातच पंचायत समितीचा महत्त्वाचा समजला जाणारा एमआरईजीएस हा विभाग जळाल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज जिंदाल यांनी चार सदस्यीय चौकशी समिती नेमली, ही समिती गटविकास अधिकारी धस यांना पाठीशी घालत असून गटविकास अधिकारी धस यांची नार्को टेस्ट करावी व राज्य शासनाने धस यांची सनदी अधिकाऱ्यांना मार्फत चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने विजय राठोड यांनी केली आहे.