जांबसमर्थ येथील खंडोबा मंदिर परिसरात ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब तांगडे यांच्या स्वखर्चातून स्वच्छता मोहीम
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील प्रभाग दोन मधील खंडोबा मंदिर परिसरात जेसीबी यंत्राद्वारे स्वच्छता करताना.(छाया.कुलदीप पवार)
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील वार्ड क्रमांक दोन मधील खंडोबा मंदिर परिसरात नाली तुंबल्यामुळे प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले होते. याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब तांगडे यांनी लक्ष घालून मंगळवारी (दिं.24) जेसीबी मशिनद्वारे परिसरातील तुंबलेली नाली काढून स्वच्छता केली. गेल्या अनेक दिवसांपासून सततच्या पावसामुळे वार्ड क्रमांक दोन मधील नालीचे पाणी खंडोबा मंदिर परिसरात येऊन साचत होते याकडे अनेकांचे सोयीस्कर दुर्लक्ष होते परंतु श्री.तांगडे यांनी स्वतः भेट देत हे सामाजिक काम केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यावेळी घनसावंगी तालुका खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष मुरलीधरराव मोगरे, संघानंद गणकवार, पंढरीनाथ वायदळ , भगवान मोगरे, मुंजाबा तांगडे, भागवत तांगडे, तुळशीराम मोगरे , बाळासाहेब कोरडे, रमेश मोगरे, अंकुश मोगरे, प्रकाश महाराज मोगरे, पांडुरंग मोगरे, शिवाजी मोगरे, अर्जुन मोगरे , ज्ञानेश्वर देवकर, नानाभाऊ राक्षे, भागवत मोगरे, सुभाष मोगरे यांच्यासह अनेकांची उपस्थीती होती, यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब तांगडे यांनी वार्ड क्रमांक दोनसह गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आगामी काळात पाठपुरावा करून अनेक योजना राबविण्यात येतील व तीर्थक्षेत्र जांबसमर्थ गावातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक योजना राबविल्या जातील असे सांगितले.