जालना जिल्हा
भीम आर्मीच्या जालना जिल्हा महिला अध्यक्षपदी रंजनाताई जाधव
जालना/प्रतिनिधी
भीम आर्मीच्या जालना जिल्हा महिला अध्यक्षपदी रंजनाताई अशोक जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांची ही नियुक्ती राज्य अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी केली आहे.राज्य संघटक रंजीत माने यांच्या सुचनेनुसार भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर यांनी नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून रंजनाताई जाधव यांचे स्वागत केले. सदर कार्यक्रम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण मर्यादित जालना,इंदेवाडी गट नं. 32 येथे झाला.जिल्हा सल्लागार एम यु पठाण, जिल्हा सचिव त.घ.दांडगे, सौ. सुनिता मगरे,वसंत पाचोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचीत महिला जिल्हाध्यक्षा रंजनाताई जाधव यांनी संविधाएन नुसार व संघटनेच्या आदेशानुसार काम करणार असल्याचे सांगितले.