राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त टिचर्स टेनिकॉईट लिग स्पर्धा उत्साहात संपन्न
जालना/प्रतिनीधी – देवगिरी इंग्लिश स्कुल जालना, जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन जालना, जालना जिल्हा टेनिकॉईट असोसिएशन व कला क्रीडा दुत फॉऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक यांच्यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त टिचर्स टेनिकॉईट लिग स्पर्धा आज दि. 29 ऑगस्ट रवीवार रोजी देवगिरी इंग्लिश स्कुल, गायत्री लॉन्सच्या बाजुला, अंबड चौफुली जालना येथे उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचे उदघाटन देवगिरी इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष बबन दादा सोरटी यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा क्रीडा कार्यालयाचे शेख मोहम्मद व देवगिरी इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापीका प्रा. गायत्री सोरटी यांची उपस्थिती होती.
सदर स्पर्धेत एकुण 16 शिक्षक व प्रशिक्षक यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा लिग कम नॉकआऊट पद्धतीने खेळवण्यात आल्या, स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे ः शिक्षक गट – प्रथम सुभाष पारे (जिवनराव पारे विद्यालय, चंदनझीरा), द्वितीय – संतोष वाघ (रंगनाथ महाराज कृषी महाविद्यालय), तृतीय अमोल काटकर (ऋषी विद्या मंदिर, जालना) जयकुमार वाहुळे (सकलेचा इंग्लिश स्कुल, जालना) उत्तेजनार्थ – तुषार गर्जे, महादेव भद्रे, शरद बांडे, गणेश गायके, नरेंद्र मुंढे, सय्यद जुनेद. सिनीयर खेळाडु गट – प्रथम शेख समीर, द्वितीय सोहेल खान, उत्तेजनार्थ – अंगद कान्हेरे, प्रकाश सिंग, गणेश चोरमारे.
यावेळी स्पर्धेचे आयोजक शेख चाँद पी.जे. यांनी राष्ट्रीय क्रीडा दिना विषयी तसेच टेनिक्वाईट खेळाविषयी सविस्तर माहिती दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंगेश सोरटी, वेदांत सोरटी, अक्षय गंगावणे आदिंनी परीश्रम घेतले.