बबनराव वाघ उपसंपादक
जालना तालुक्यातील रामनगर कारखाना गेट नंबर एक जवळील गणपती मंदीरासमोर बंद पडलेल्या ट्रकला पाठीमागुन धडक दिल्याने मोटारसायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे सात वाजे दरम्याण घडली.
जिंतूर येथून जालना कडे जाणरा ट्रक क्रं. MH21-X1000 हा सोमवारी रात्री दहा वाजे दरम्याण गणपती मंदीरासमोर डिजेल संपल्यामुळे बंद पडला होता.सकाळी साडे सात वाजे दरम्याण मल्हार सर्जेराव गायकवाड हा रोजच्या प्रमाणे जालना येथे पोलाद कंपनीत कामासाठी जात होता.मोटारसायकल क्रं. MH21-BJ5692 ने जात असतांना, पाऊस सुरू असल्यामुळे त्याली ट्रक उभा असल्याचे समजले नाही व तो ट्रकला धडकला. यात मल्हारचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून मौजपुरी पोलीसांना खबर मिळाल्याने मौजपुरी पोलीस ठाण्याचे चयनसींग नागलोत व चालक बिरादार हे घटनास्थळी पोहचले व मृतकाचा देह उत्तरीय तपासनीसाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.