अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची माजीमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली पाहणी

कुलदीप पवार/प्रतिनिधी
जालना जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास वाया गेला आहे.या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे माजीमंत्री उपनेते अर्जुन खोतकर यांनी शुक्रवार (दि.१४) रोजी जालना तालुक्यातील नुकसानग्रस्त धारकल्याण,कडवंची,नंदापूर,पिरकल्याण आदी गावात प्रत्यक्ष जाऊन कापूस, सोयाबीन, तूर,मोसंबी, द्राक्ष पिकांची पाहणी केली.
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.या संदर्भात जिल्हा प्रशासनाला सूचना केलेल्या असून झालेल्या नुकसान मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषीमंत्री अब्दुल सत्तार,यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. यावेळी पंडीतराव भुतेकर,भाऊसाहेब घुगे, संतोष मोहिते, बंडू राजे, आप्पा उगले,सदानंद उगले,आप्पासाहेब घोडके,रावसाहेब इंगोलो,सर्जेराव वाघ,संजय वाघ,विष्णू वाघ,बळीराम वाघ यांच्यासह परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.