घनसावंगी तालुकामनोरंजन

कुंंभार पिंपळगावात बैलपोळा सणाच्या तयारीसाठी बाजार सजला

कुंभारपिंपळगाव येथील आठवडी बाजारात मुख्य रस्त्यावर पोळ्याच्या साजाची दुकाने अशाप्रकारे थाटली होती.दुकानांतुन साहित्य खरेदी करताना शेतकरी.

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव /कुलदीप पवार

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सण म्हणजे बैलपोळा.हा सण अगदी चार दिवसावर येउन ठेपला आहे.घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील आज दि.1 बुधवार रोजी आठवडी बाजारात बैलपोळा साजची दुकाने मोठ्या प्रमाणात मुख्य रस्त्यावर थाटली होती.कोरोनाचे संकट पुन्हा येते की काय याची श्वासती नसल्याने अनेक शेतकरी साहित्य खरेदी करण्यास उदासीन असल्याचे दिसून आले.

गेल्या तीन दिवसापासून पावसाची रिपरिप सुरुच असल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहेत.पिकांची स्थिती चांगली असली तर शेतकरी बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.परंतु कोरानाचे सावट यावर्षीही राहते की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.दरम्यान यावर्षीही बैलपोळा हा सण कोरोनाच्या नियमांचे पालन करून साधेपणानेच साजरा करावा लागणार असल्याचा अंदाज व्यापारी व शेतकऱ्यांतून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, आज दि.1 बुधवार रोजी कुंभार पिंपळगाव येथील आठवडी बाजारात बैल पोळासाठी बैलांना सजविण्यासाठी लागणारे साहित्य झुला,गोंडे,कासरा,वेसन, काव,घुंगरू,घागरमाळ आदी साहित्याची दुकाने मुख्य रस्त्यावर थाटलेली होती.परंतु साहित्य खरेदीस शेतकऱ्यांकडुन अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!