मॉडेल कॉलेज घनसावंगी च्या प्राचार्यपदी डॉ. चंद्रसेन कोठावळे यांची नियुक्ती,तर प्राचार्य डॉ. विश्वास कदम यांना दिला निरोप

प्रतिनिधी घनसावंगी / नितीन राजे तौर
मॉडेल डिग्री कॉलेज घनसावंगी च्या प्राचार्यपदी डॉ. चंद्रसेन कोठावळे यांची नियुक्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केली आहे.त्यानिमित्त महाविद्यालयांमध्ये नवनियुक्त प्राचार्य यांचे स्वागत आणि मावळते प्राचार्य डॉ. विश्वासराव कदम यांना निरोप देण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून घनसावंगी येथील नगरपंचायत चे नगरसेवक नंदकुमार देशमुख यांची उपस्थिती होती.यावेळी त्यांच्या हस्ते प्राचार्य विश्वासराव कदम यांचा सन्मान करण्यात आला.” प्राचार्य डॉ. विश्वासराव कदम यांनी समर्पण भावनेने कार्य केले ते ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा धनी आहेत. असे गौरवोद्गार देशमुख यांनी काढले” नवनियुक्त प्राचार्य डॉ.चंद्रसिंग कोठावळे यावेळी म्हणाले की” घनसावंगी येथील मॉडेल कॉलेज येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भौतिक सुविधेसह ,वेगवेगळ्या कौशल्य परक अभ्यासक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार आहे. विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचे त्यांनी यावेळी आभार मानले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, उच्च शिक्षणातील मागासलेपण आणि घनसावंगी च्या विकासात मॉडेल कॉलेजचे महत्त्वाचे योगदान ठरेल “असे ते म्हणाले.
यावेळी प्रा. डॉ.कनूलाल विटोरे, डॉ भीमराव पुंडगे,प्रा.उदय पवार, प्रा.बाळासाहेब वरखडे, गणेश सुरासे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बाळासाहेब सोनवणे तर आभार प्रदर्शन डॉ. ऋषी बाबा शिंदे यांनी मानले.यावेळी बाबासाहेब तेलगड तसेच महाविद्यालयातील प्रा. न्यानेश्वर खोजे, खंडू नवखंडे, प्रा. उदय पवार, प्रा.बालमीक मेश्राम, प्रा. भागवत गोरे प्रा. डॉ. संतोष गायकवाड, प्रा. डॉ. संभाजी मराठे, डॉ. विठ्ठल लोंढे डॉ.अनिल तोपकर,डॉ.शरद सुबगडे प्रा. सुधीर कुमार राठोड, श्री नेमिनाथ मुले, सतीश ब्राह्मणे, अर्जुन साबळे, नारायण बंकट ,सोमवार, गणेश तारगे, अंभोरे, देवडे,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.