मराठावाडा

तांबडी भेंडी! औरंगाबादमधील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग

औरंगाबाद /संभाजी देशमुख

images (60)
images (60)

सध्या बाजारात भेंडीच्या भाजीचे हिरव्या रंगातील विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळत असले, तरी औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक तांबडी भेंडी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

ही तांबडी भेंडी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी असल्याचा दावा विक्रेत्यांकडून केला जात आहे. या भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात पाचोड परिसरात करण्यात आली आहे.

पाचोड येथील शेतकरी प्रकाश गायकवाड यांच्यासह परिसरातील काही शेतकऱ्यांनी तांबड्या भेंडीची लागवड केली. एक एकरमध्ये चार बाय एक-दोन फूट, अशा अंतरावर या भेंडीची लागवड करण्यात आली.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही भेंडी असल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. तर तांबड्या भेंडीचे वाण हे वाराणसी भाजी अनुसंधान केंद्राकडून विकसित करण्यात आले आहे.

या भेंडीचा सरासरी दीड महिन्यानंतर पहिला तोडा होतो. पाच ते सहा तोडे केले जातात. सुरुवातीला औरंगाबादच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजारपेठेत ३१ ते ३२ रुपये किलोचा बाजारभाव मिळाला.

त्यानंतर मात्र, भाव घसरणीला लागले. कारण लाल रंगांची भेंडी सुरुवातीला ग्राहकांना चकित करत होती. त्यामुळे सुरुवातीला विक्रीत अडचण आल्याचे उत्पादकांनी सांगितले. मात्र विक्री व्यवस्थापन साधले तर शेतकऱ्यांना फायदेशीरही ठरू शकते.

या भेंडीचे काय आहेत फायदे?:

या भेंडीत अ, ब, क जीवनसत्त्व साधारण ३० टक्के प्रमाणात असल्याचे सांगितले जाते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही भेंडी असल्याचा दावाही केला जात आहे.

तांबड्या भेंडीला गोव्यातून अधिक मागणी असल्याचे जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील भेंडी विक्री व्यवसायातील व्यापारी सांगतात.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!