मंठा:जप्त साठ्यातुन वाळू होतीय चोरी ,पोलिसांच्या मदतीने तलाठी यांची कारवाई
जप्त वाळुसाठ्यातून सर्रास वाळुचोरी हायवा पकडला : अवैध वाळु विक्रीचा गोरखधंदा उघड
तळणी : मंठा तालुक्यातील सासखेडा येथून जप्त वाळूसाठ्यातून अवैध वाळुची विक्री व वाहतुकीचा हायवा तलाठ्यानी पोलीसांच्या मद्दतीने शुक्रवारी दुपारी ५ पकडला.
सासखेडा ( ता. मंठा ) येथे रात्रीतून पूर्णा नदीपात्रातून अवैध उत्खनन करुन वाळुसाठा करायचा अन् दिवसाढवळा अवैधरित्या विक्री करायचा गोरखधंदा सुरु आहे.
सासखेडा येथील संतोष भगवान जाधव यांच्या गट क्र. १७ मधील २२ ब्रास ३०/८ रोजी जप्त वाळुसाठ्यातून अंदाजे एक ते दिड ब्रास वाळु हायवा क्र. एम एच ३७ टि ९९९९ मालक अंभग किसन वाघ रा. सेलगाव राजगुरु ता. रिसोड व चालक संतोष शेषराव पवार रा. पानकनेरगाव ( ता. सेनगाव ) हायवामध्ये मध्ये जेसीबीच्या साह्याने अवैध वाळुभरली जात असताना तळणीचे तलाठी नितीन चिचोले व दुधाचे तलाठी एम पी साळवे यांनी घटनास्थळी पकडला. मात्र, जेसीबी पळून जाण्यात यशस्वी झाली. सदर हायवा तळणीचे पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी इदल राठोड व पांडूरंग हगवणे याच्या मद्दतीने पुढील कारवाईसाठी मंठा तहसील कार्यालयात लावण्यात आला आहे.
अवैध वाळुचोरी सुरु , तहसीलदारांचे दुर्लक्ष ?
पुर्णा नदीपात्रातून देवठाणा , उस्वद , सासखेडा , टाकळखोपा , वाघाळा, किर्ला , पोखरी केंधळे व भूवन येथून दिवसरात्र मोठ्या प्रमाणात अवैध वाळु उत्खनन करुन साठे केले जाते. ‘त्या’ साठ्यातून अवैध वाळुची चढ्या दराने विक्री होते. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. या गंभीर प्रकाराकडे मंठ्याचे तहसीलदार सुमन मोरे यांचे ‘अर्थपुर्ण’ दुर्लक्ष असलेतरी तळणीचे तलाठी नितीन चिचोले यांच्यासह नव्याने रजू झालेले तळणीचे मंडळ अधिकारी बी के घुगे व दुधा सज्जाचे तलाठी एम पी साळवे यांच्या धडक कारवाईमुळे वाळुमाफियाचे धाबे दणाणले आहे.
‘त्या’ जेसीबीविरुध्द कारवाई होणार ?
सासखेडा येथील जप्त वाळुसाठ्यातून तब्बल २० ब्रास वाळुची विक्री झालेले आहे. ज्या जेसीबीच्या साह्याने भरण्यात येणारा हायवा महसूलने ताब्यात घेतला. मात्र, ‘त्या’ जेसीबीविरुध्दही महसूल विभाग कारवाई करणार कधी ? असाही प्रश्न उपस्थित होत आहेत.
तलाठी चिचोलेची भूमिका अस्पष्ट ?
तलाठी नितीन चिचोले यांच्याकडील सज्जातील देवठाणा, उस्वद , कानडी या सज्जातून मोठ्याप्रमाणात वाळुचोरी होत असून प्रभारी सज्जा टाकळखोपा गावातूनही मोठ्याप्रमाणात वाळुचोरी सुरु असतानादेखील त्याकडे नेमक दुर्लक्ष का ? असाही प्रश्न उपस्थित करीत तलाठी चिचोले यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.