भेंडाळा तांडा येथे गोरसेना नामफलकाचे अनावरण
कुंभार पिंपळगाव:भेंडाळा तांडा येथे आज गोरसेना नामफलकाचे अनावरण गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा तांडा येथे गोरसेना नामफलकाचे अनावरण आज (दि.५) रविवार रोजी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मुरलीधर राठोड,तालुकाध्यक्ष बाळु राठोड,रविंद्र राठोड, गणेश राठोड,शिवनारायण राठोड,अंकुश चव्हाण, शंकर चव्हाण, अमोल राठोड, आदिनाथ पवार, अमोल राठोड,एकनाथ राठोड,के.के.पवार,गोरख पवार, आकाश राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शाखा कार्यकारणीत शाखा अध्यक्ष राहुल राठोड,उपाध्यक्ष पवन जाधव,सचिव अर्जुन राठोड, कोषाध्यक्ष अनिकेत चव्हाण, संघटक विष्णू राठोड यांच्यासह अनेक सदस्यांचा समावेश आहे.