घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी पालकमंत्री काय करतात -आमदार बबनराव लोणीकर यांचा सवाल

 

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव:घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व इतर.

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

जालना जिल्ह्यातीलतील शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट आर्थिक मदत करा, नसता रुमणं हाती घ्यावा लागेल असा इशारा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्यसरकारला दिला आहे.
ते आज दि.12 रविवार रोजी घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागांचा पाहणी दौऱ्याप्रसंगी बोलताना केले.
पुढे बोलतांना लोणीकर म्हणाले की,अतिवृष्टीने घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून तोंडाघशाशी आलेला हास हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी मात्र आर्थिक कोंडीत सापडलेला आहे.
अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. अश्या परिस्थितीत तिघाडी सरकारने तात्काळ मदत करण्याची गरज असल्याचे मत माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केले.
राज्य सरकारला शेतकऱ्यांचे दुःख समजत नसून माझ्या शेतकऱ्यांची आर्त हाक सरकारला ऐकू येत नसेल तर या राज्याचे दुर्देव असल्याचे मत माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले.

आमदार लोणीकरांनी केली पालकमंत्री राजेश टोपे यांच्यावर टिका..

जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे हे जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्यांच्याकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचे खंत लोणीकर यांनी व्यक्त केले.अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून तिघाडी सरकारला शेतकऱ्यांचे दु:ख समजत नसल्याचे मत मांडले.

या दौऱ्यादरम्यान आमदार बबनराव लोणीकरांनी राणीउंचेगाव,पानेवाडी,सिंदखेड, कुंभार पिंपळगाव,राजाटाकळी,अंतरवाली टेंभी,तिर्थपुरी,मोहपुरी,निपाणी पिंपळगाव, माणेपूरी आदी ठिकाणी अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी केली.
या वेळी सर्जेराव जाधव, रमेश महाराज वाघ, अंकुशराव बोबडे, संजय तौर,कैलास शेळके, गोविंदराव ढेबरे किरण गुढेकर, राम भालेराव, सुनील शेंडगे, हरीश पाटोळे, अर्जुन माळवदे,रामेश्वर साळुंखे,नाना सोळंके, भास्कर असकंद, गजानान कदम, सुरेश पोटे, गोविंद ढेमबरे,बाळासाहेब बहीर , किरण गुढेकर, राम गणेश मेगडे रफीक भाई, आफोरोज भाई ,विलास चव्हण ,भालेराव, सुनील शेंडगे, हरीश पाटोळे, अर्जुन माळवदे, हिंगुडे मामा गाडेकर मगरे रामेश्वर साळुंखे भास्कर असकंद, गजानान कदम, सुरेश राजाटाकळी चे सरपंच डिगु नाना आर्दड बापुसाहेब आर्दड गोविंदराव आर्दड गणेश आर्दड अंगद तौर पोटे ,सुरेशराव उगले एकनाथ राढोड, आप्पा साहेब आधुडे ,बप्पा आधुडे ,सुभाष आधुडे ,आमोल काळे ,रमेश काळे, अशोक जाधव ,राजेन्द्र तौर, प्रताप कटुले, पंचायत समिती सदस्य उदावंत संदीप काळे शिध्दु भानुसे ,नितिन भुते दत्ता पाटील टेकाळे ,पवण पठाडे ,लक्ष्मण मोटे, तुषार परदेशी, राहुल बोबडे तुळशीराम ढेंबरे, गोरखनाथ कांगडे, प्रकाश ढेंबरे ,रघुनाथ ढेंबरे, रामजी परकाळे ,सोमनाथ गव्हाणे, अमोल गव्हाणे, विठ्ठल गोल्डे, सर्जेराव ढेंबरे, पांडुरंग ढेंबरे यांच्या भारतीय जनता पार्टी आजचा मोर्चा कार्यकर्ते जिल्हा उपाध्यक्ष हरीष पाटोळे जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक किरण गुडेकर तालुका अध्यक्ष तालुका रामदास भालेराव तालुका उपाध्यक्ष सचिन पाटोळे प्रसिद्धीप्रमुख घनसावंगी सुनील शेंडगे व इतर कार्यकर्ते सुनील गुढेकर, संतोष गुढेकर ,अंकुश मेंगडे ,गणेश मेंगडे ,रामेश्वर मेंगडे पुंजाराम मेंगडे नारायण मेंगडे अविनाश गुडेकर रोहित ,भोसले दनियल भोसले ,अशोक पप्पु गुढेकर ,यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!