घनसावंगी तालुका
संदेश पवार यांचे तबला परीक्षेत यश संपादन
कुंभार पिंपळगाव:विरेगव्हाण तांडा(ता.घनसावंगी) येथील संदेश पवार यांना प्रमाणपत्र देताना शिक्षक प्रसन्न देशपांडे.
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
विरेगव्हाण तांडा(ता.घनसावंगी) येथील संदेश संपत पवार याने मुंबई येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या तबला परीक्षेत जालन्याच्या भगवान महाराज संगीत विद्यालय केंद्रातून संदेश संपत पवार याने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होवून यश संपादन केले आहे.यासाठी त्याला संगीत विषयाचे शिक्षक प्रसन्न देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.