घनसावंगी तालुकाजालना क्राईम

जावयाने केला सासऱ्याचा निर्घृण खुन ;पोलिसांनी केली आरोपीस अटक

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण येथील एका बाणा नदीच्या पात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना दि.13 सोमवार रोजी दुपारी चार वाजेच्यादरम्यान घडली.या मृत इसमाचा नाव रमेश चिमाजी भारसाखळे रा.खांडवी ता.परतूर जि जालना असे मृत व्यक्तिचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की,रमेश चिमाजी भारसाखळे रा.खांडवी ता.परतूर जि.जालना हे बेपत्ता असल्याची नोंद घनसावंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.दरम्यान विरेगव्हाण येथील बाणा नदीच्या पात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी कुंभार पिंपळगाव येथील पोलिस चौकीला दिली.दरम्यान येथील पोलिस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ व सर्व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन सदरील घटनेचा पंचनामा केला.घनसावंगी चे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरविताच एका आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले.फिर्यादी राजेश भारसाखळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जावई अरूण काशीनाथ आव्हाड व त्याचा एक साथीदार यांनी अज्ञात कारणावरून सासऱ्याचा बाणा नदी पात्राच्या पाण्यात बुडवून निर्घृण खून केल्याची कबुली दिली. आरोपी अरूण काशीनाथ आव्हाड यांना पुणे येथे एक पथक पाठवून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.व त्यांचा दुसरा साथीदार यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे.फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं 342/2021 कलम 302,34 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन पतंगे, पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ,पो.हे.का.रामकृष्ण कुंटे,पोना रामदास केंद्रे, पोलीस हवालदार नवनाथ राउत, पोलीस हवालदार गोपाळ दहीवाळ, पोलीस हवालदार आर गुसिंगे,पो. हवालदार नागलोत,पो. हवालदार वैराळ हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!