दिवाळी अंक २०२१देश विदेश न्यूजमराठावाडा

मराठा आरक्षणच्या मुद्धावरून जालन्यात तरुणांची आत्महत्या.

परतूर / प्रतिनिधी

images (60)
images (60)


ओलादुष्काळ आणी मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे  नोकरी ही लागत नाही या सर्व परिस्थितीलाा कंटाळून येणोरा ता. परतूर येथील तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना (दि १४ सप्टेंबर) मंगळवारी दुपारी घडली.  सदाशिव शिवाजी भुंबर वय २२ असे आत्महत्याा केलेल्य तरुणाचे नाव आहे.आत्महत्यापूर्वी लिहलेल्या चिट्टी मध्ये आत्महत्या ही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने आत्महत्या करत असल्याचे चिट्टीत नमूद आहे


सदाशिव हा पुणे येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करीत होता. त्याने इलेक्ट्रिशियन चा कोर्स केलेला आहे मात्र मराठा समाजाला आरक्षण नसल्याने त्याला पाहिजे तशी नोकरी मिळत नव्हती . वीस पंचवीस दिवसांपूर्वी तो गावाकडे येनोरा येथे आला होता. त्याला चार एकर शेती आहे ,मात्र गावाकडे ही सतत पाऊस , ओला दुष्काळ असल्याने शेतातील पिके ही हातची गेली आहेत. आता पुढे कसं व्हायचं ?याच विवंचनेत त्याने मंगळवारी घरच्या छताच्या अँगल ला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .तशी चिठ्ठी ही त्याने लिहून ठेवली असल्याचे त्याचे चुलते अंकुश भुम्बर यांनी सांगितले.


या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु ची नोंद घेण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे .पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!