पाणीवेस ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रस्ता सुरळीत करण्याची मागणी
न्यूज जालना । शहरातील पाणीवेस ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या प्रमुख मार्गामधील मुर्तीवेस मोडकळीस आल्याने हा रस्ता अंदाजे 2 महिन्यापासून बंद आहे . हा रस्ता शहरातील महत्वाचा रस्ता आहे.
या मार्गातील मुर्तीवेस मोडकळीस आल्याने काही जीवीत हानी होऊ नये म्हणून सदरील रस्ता बंद करुन पर्यायी रस्ता उपलब्ध करुन दिला आहे. मात्र, पर्यायी रस्ता अरुंद व तसेच पुर्णपणे खड्डेमय झाला असून नेहमीच या मार्गावर वाहतुक कोंडी मोठया प्रमाणावर होत आहे . पादचारी व महिला वाहन चालक यांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे .
तरी लवकरात लवकर पाणीवेसची योग्य ती दुरुस्ती करुन जन सामान्यांसाठी रस्ता खुला करावा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मंगेश कापसे, शुभम टेकाळे, योगेश कदम, आकाश जगताप, पृथ्वीराज भुतेकर, उदय भोसले आदी उपस्थित होते.