बावळट सरकार कधीपण तिसरी घाट आणेल – हभप पुरुषोत्तम महाराज पाटील
तळणी : पहिलेच तर दोन वर्ष झालेत घरीच आहोत. आता नेमकेच कुठे सुरु झालेतर हे बावळट सरकार कधीपण तिसरी घाट आणेल पण, येणार नाही . मला हेच कळत नाही की राजकीय लोकांचा कोरोना सासरा आहे की जावई ? असे प्रतिपादन हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले.
मंठा तालुक्यातील तळणी येथे शनिवार दुपारी गणेशोत्सव निमित्त एकदिवसीय किर्तन सेवेचे आयोजन आराध्या कंन्ट्रक्शनचे शरद दहातोंडे पाटील व श्रीकृपा कंन्ट्रक्शनचे भगवान देशमुख यांनी केले होते. या कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते.
किर्तनात पुढे बोलताना पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वाधिक दारुविक्री फक्त गणेशोत्सव मिरवणूकीत व छत्रपत्री शिवाजी महाराज जयंतीच्या काळात होते. म्हणून आम्हाला कुठे नेऊन ठेवलाय आमचा धर्म असे म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे. जीवनातील व्यसने , अवगुन व दोष कमी करणे म्हणजेच गणरायाची एका अर्थाने स्थापना करणे होय , आजच्या तरुणांनी व्यसनमुक्त जीवन जगावे, शेतक-यांच्या मुलांनी नवनवीन व्यवसायिक शिक्षण घेऊन शेतीबरोबर जोडधंदे करावे , तरुणांनी देशप्रेम, राष्ट्रप्रेम व धर्मप्रेम जपले पाहीजे , आईवडीलची सेवा करा. ईश्वर तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही, असे ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी सांगितले. यावेळी तळणी पंचक्रोशीतील महिलांसह भाविकांची मोठी उपस्थिती होती.