घनसावंगी तालुका

शिवनगावात मिशन कवच कुंडल अंतर्गत कोविड लसीकरण मोहीम : ग्रामस्थांतुन उत्स्फूर्त प्रतिसाद

घनसावंगी प्रतिनिधी / नितिन राजे तौर

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्या प्रेरणेने व आदेशान्वये मिशन कवच कुंडल अंतर्गत सोमवारी (ता.२०) कोविड लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त पणे प्रतिसाद मिळाला.
या मोहिमेत दिवसभरात खुप मोठा प्रतिसाद मिळाला तब्बल २३४ जणांचे लसीकरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिक्षण विस्तार अधिकारी बा ना सोळंके, केंद्रीय मुख्याध्यापक पी पी येडले, सरपंच अशोक तौर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामेश्वर तौर,माजी सरपंच प्रकाश तौर,व शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण तौर व सहकारी शिक्षक युवराज डावकर,आर एस धरणे, डी बी चोपडे,पी आर राऊत आरोग्य सेविका पाठक मॅडम ,अंगणवाडी कार्यकर्ती शोभा एस तौर(जाधव) यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!