घनसावंगी तालुका

अज्ञात वाहनाच्या धडकेने वानर गंभीर जखमी;ग्रामस्थांच्या मदतीने वानरास मिळाले जीवदान

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

अंबड पाथरी राज्य मार्ग रस्त्यावरील विरेगव्हाण तांडा जवळ एका वानराने रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव वेगाने चारचाकी वाहन चालविणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने वानराला दोन्ही पायावर जबर धडक दिल्याने यात वानर गंभीर जखमी झाला आहे.वानरास चालणेही अवघड झाले आहे.हि घटना मंगळवार दि.(२१) रोजी सकाळी घडली.ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत असलेल्या वानरास पाहिले व तात्काळ वनविभागास घटनेची माहिती दिली.वनविभाग व गावकऱ्यांच्या सहकार्याने वानराला पुढील उपचारासाठी घनसावंगी येथील पशूवैद्यकीय दवाखान्यात हलविण्यात आले.परंतू घनसावंगी येथील पशूवैद्यकीय दवाखान्यात जनावरांच्या बंदोबस्तासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे वनविभागाने जखमी वानरावर उपचार करून वानरास गावकऱ्यांकडे स्वाधीन केले.ग्रामस्थ शाम राठोड,अंगद राठोड, अमोल राठोड, विनोद राठोड, सतीश राठोड, विकास राठोड, पप्पू पवार यांच्या मदतीने सदरील वानरास जीवदान मिळाले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!