अंबड तालुका

अंबड उपजिल्हा रुग्णालयच “व्हेंटिलेटर” वर..!

आओ जाओ घर हमारा..! रुग्णालय कर्मचाऱ्यांचे तत्व..!

images (60)
images (60)

अनिल भालेकर/अंबड

सर्वसामान्य जनतेला ज्या मूलभूत सोयीसुविधा प्राधान्याने मिळायला हव्यात त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य यंत्रणा असते. ग्रामीण भागासह शहरी भागातील सर्वसामान्य व गरीब जनतेची भिस्त शासकीय आरोग्य यंत्रणेवर अवलंबून असते. आणि उत्तम आरोग्य सेवा पुरवणे हे प्रशासनाचे आद्य कर्तव्य ठरते.
परंतु याला अपवाद उपजिल्हा रुग्णालय दर्जा प्राप्त अंबड येथील शासकीय रुग्णालय ठरते. या विषयी सविस्तर वृत्त आसे की विविध मागण्याचे निवेदन रिपब्लिकन सेना युवा जिल्हा आध्यक्ष राहुल व्हि.खरात यांनी शिष्टमंडला सहित प्रभारी वैधकीय अधीक्षक डॉ.सागर गंगावल यांना दिले. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे निर्धारित केलेल्या वेळेप्रमाणे डॉक्टर आपली सेवा बजावत नाही. तरी
मात्र उपस्तिति ही सर्व डॉक्टरांची कागदोपत्री दाखवली जाते. आर्थिक तड़जोडी करुण डॉक्टर यांनी सहकार्य केले जात असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आला आहे.यामुळे सर्वसामान्य गोर गरीबांचे हाल होत आहेत.रुग्णाना वेळेत उपचार भेटत नाहित.त्यांना वेळेत ऐडमिट करुण घेतले जात नाही.
रात्री अपरात्री उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांना ची अत्यंत वाईट परिस्थिती होत असते. याला सर्वस्वी जबाबदार डॉक्टर आहेत.सर्वच यंत्रणावर वारिष्टाचा अंकुश उरला नाही.
जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना शासकीय निवास्थान आहेत आशे असताना या निवास्थानावर खाजगी स्वघोषित कर्मचारी यांनी बेकायदा रित्या ताबा केला आहे. आश्या कर्मचारी यांची नेमनुक कुणी केली कुणाच्या आदेशना केली या सर्व गोष्टी च खुलास करन्यात यावा.
खऱ्या अर्थाने जे शासकीय कर्मचारी, सिस्टर,ब्रदर्स आहेत त्यांना नियमानुसार शासकीय निवासस्थान देण्यात येते परंतु राजकीय तबावतंत्र वापरून काही खाजगी लोक यांनी कोर्टर वर ताबा केला आहे.
शासकीय डॉ.सिस्टर,ब्रदर्स, कर्मचारी यांना शासकिय निवासस्थानी शिफ्ट करावे.
त्या सोबतच डॉ यांनी ही शासकीय निवासस्थानी आसावे आसे बंधन कारक असताना डॉक्टर मात्र निवास्थानी का राहत नाहित.यांची ही चौकशी करुण संवधितावर कार्यवाही कारावी. नसता पंधरा दिवसा नंतर रिपब्लिकन सेनाच्या वतीने शेकडो कार्यकर्त्या सह अंबड उपजिल्हा रुग्णालया समोर उपोषणास बसन्यात येईल,आसा ईशारा रिपब्लिकन सेना युवा जिल्हा आध्यक्ष राहुल व्हि खरात यांनी दिला आहे.या निवेदनावर जेष्ठ नेते शाहिर दिलीप खरात,चेतन गिरी,महेश कासार, प्रल्हाद तुपसौदंर,अर्जून निकालजे सतिष अजगर,विलास खरात संतोष सोनावणे,आदिच्या स्वक्षरी आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!