जालना जिल्हा

मस्तगड ते रेल्वे स्टेशन रस्त्याच्या सिमेंटी करणाच्या कामास प्रारंभ

दर्जेदार व गुणवत्तापुर्ण काम करण्याची आ. कैलास गोरंट्याल यांची सुचना
जालना (प्रतिनिधी) ः  मंमादेवी मंदीर मस्तगड ते रेल्वे स्टेशन या रस्त्याच्या सिमेंटीकरणाच्या कामांस सुरुवात करण्यात आली असून या रस्त्याचे काम  दर्जेदार होईल याकडे लक्ष द्यावे अशी सुचना आ. कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.

images (60)
images (60)


आ.  कैलाश गोरट्याल यांनी राज्य शासनाकडुन वैशिष्टपुर्ण योजने अंतर्गत मंजुर करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ काही दिवसांपुर्वीच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते व जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा सौ. संगिताताई गोरंट्याल, युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. सदर रस्त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली असून रस्त्याचे काम करतांना कुठलीही कुचराई सहन केली जाणार नाही असे स्पष्ट करत सदर रस्त्याचे काम दर्जेदार व गुणवत्तापुर्ण करण्याच्या सुचना आ. गोरंट्याल यांनी दिल्या आहेत.  येणार्‍या कालावधीत वैशिष्टपुर्ण योजने अंतर्गत राज्य शासनाकडुन मंजूरी मिळालेल्या रेल्वे स्टेशन ते पित्ती पेट्रोल पंपापर्यंत या रस्त्याच्या सिंमेटी करणाचे काम  देखील लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.
   सदर काम दर्जेदार करून घेण्यासाठी प्रभागाचे नगरसेवक महावीर ढक्का यांनी सदर कामावर विशेष लक्ष ठेवले असून नगर परिषदेचे अभियंता सय्यद सउद, नगरसेवक विष्णु पाचफुले, नगरसेवक अशोक  पवार, नगरसेवक सय्यद आरेफ, अशोक पाटोळे यांनी रस्त्याच्या कामाला नुकतीच भेट दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!