कुंभार पिंपळगाव ग्रामपंचायतमध्ये सरपंचपुत्र यांचा हस्तक्षेप :उपसरपंच,सदस्य यांची तक्रार
मुख्य संपादक न्यूज जालना : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाज सरपंचाऐवजी मुलगा व नातेवाईक पाहत आहे. यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना कामे करतांना अडचण निर्माण होत आहे. निधीचाही योग्य विनियोग होत नसून, ग्रामसेवकासमोर सरपंचाचा मुलगा स्वाक्षऱ्या करीत आहेत. याबाबत ग्रामसेवकांना सांगूनही उपयोग होत नसल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
सरपंचाचा मुलगा हस्तेक्षेप करीत असल्याची बाब उपसरपंच व सदस्यांनी अनेकवेळा ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. तरीही सदर प्रकार बंद झाला नाही. गावात अनेक समस्या आहेत, त्याकडे जाणून- बुजून दुर्लक्ष केले जात आहे. नाल्या तुंबलेल्या असून, पाणी पुरवठा बंद आहे. अतिवृष्टीमुळे काही रस्ते खचले आहेत. या कामांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च न करता निधीचा अपहार करण्याची शक्यता आहे. याबाबत चौकशी करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपसरपंच रेखा गाढे, शिवाजी कंटूले, अतुल कंटूले, रफिक कुरेशी, हस्नोद्दिन शेख, हिना शेख, आमिनाबी शेख, वनिता व्यवहारे, लताबाई उदावंत, बुढन शेख आदींनी दिला आहे.
सरपंचाच्या पुत्राचा हस्तक्षेप वाढल्याने विकास कामाला खिळ बसली आहे. सदस्यांची कुचंबणा होत आहे. वार्डातील समस्या मांडल्यास सरपंचांचे नातेवाईकच बोलू देत नाही.-
सौ.रेखा गाढे, उपसरपंच कुंभार पिंपळगाव