जिल्हा परीषद शाळेची घंटा वाजली

कुंभारपिंपळगाव:विरेगव्हाण तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षण उपस्थित होते
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा-महाविद्यालय बंद होत्या.परंतु कोरोना रूग्णांची संख्या आता रोडावली आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.त्याअनुषंगाने विरेगव्हाण तांडा(ता. घनसावंगी) येथील जिल्हा परिषद शाळा भरण्यास आज दि.४ सोमवार रोजी सुरूवात झाली.यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांची तापमान तपासणी करण्यात आली.सुरक्षित अंतर नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना बसविण्यात आले.शाळा भरण्यास सुरूवात झाल्याने विद्यार्थ्यांना आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले.दरम्यान,शाळेचा परीसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाट आवाजाने गजबजून निघाला आहे.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,उपस्थित होते.
आजपासून प्रत्यक्षात शाळा सुरू होत आहे.शिक्षकांनी पुर्वतयारी केलेली आहे.मुलांप्रमाणेच शिक्षकांना शाळा उघडल्याचा आनंद आहे.प्रत्येक विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून प्रवेश दिला जाणार आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी प्रोत्साहित करावेत.
भिमराव जाधव
मुख्याध्यापक, जि.प.शाळा