गुंज बु.येथील जिल्हा परीषद शाळेच्या शिक्षकांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

कुंभारपिंपळगाव:गुंज बु.येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय समितिचे अध्यक्ष,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
शासनाने दिलेल्या आदेशानुसार दि.४ आक्टोंबरपासुन ग्रामीण भागातील ५ ते ८ पर्यंत प्रत्यक्षात शाळा भरविण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.त्याअनुषंगाने जिल्हा परीषद प्राथमिक शाळा गुंज येथे पहिल्या दिवशीचे औचित्य साधून वर्ग पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर बसविण्यात आले. आक्सिमिटरच्या साहाय्याने प्रत्येकांची तपासणी करण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांनी मास्क वापरणे,सुरक्षित अंतर राखणे,वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत अशा विविध सुचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.प्रत्यक्षात शाळा सुरूवात झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले.यावेळी मुख्याध्यापक दिगांबर मोरे,बहिर,शिंदे, सिरसाठ,देव,गोटावले,जंगवाड,खांडेकर, काटे,सुरणार यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.