विश्वासाची परंपरा जपणारे कुंभार पिंपळगाव येथील केसुला झेरॉक्स अँड जनरल स्टोअर्स.!
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव हे तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाते.या बाजारपेठेत विरेगव्हाण तांडा येथील अमोल राठोड या होतकरू युवकाने वडील व इतर मित्रपरीवाराच्या सहकार्याने सन २०१७ साली त्यांनी स्वता:ची केसुला झेरॉक्स अँड जनरल स्टोअर्स या दुकानाची उभारणी केली आहे.तो उच्चशिक्षित विद्यार्थी आहे.परंतू त्यांनी नोकरीपेक्षा व्यवसायाला जास्त प्राधान्य दिले.त्यांना हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेकांनी मार्गदर्शन करुन आर्थिक मदतही केली.या व्यवसायाला जास्त यश प्राप्त होते.
म्हणून त्यांनी व्यवसाय उभारण्याचे ठरविले.व्यवसाय निवडत असतांना नफाच हा जिवनाचा हेतु न ठेवता व्यवसायाच्या माध्यमातूनही सेवाभाव रहावा हे लक्ष समोर ठेवले.दुकानातील साहित्याची खरेदी -विक्री करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असतात.समाजकार्याचा वसा हातात घेत या युवकाने अवघ्या काही दिवसांतच आपले व्यवसायिक क्षेत्रात स्थान निर्माण केले आहे.या दुकानात जनरल स्टोअर्स,शालेय साहित्य, स्टेशनरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गिफ्ट,लेडीज सौंदर्य प्रसाधने,वह्या, पुस्तके,पेन इत्यादी असे विविध प्रकारचे साहित्य ग्राहकांसाठी योग्य माफक दरात उपलब्ध करून देतात.तसेच झेरॉक्स व इतर सर्व आँनलाईन कामे देखील करीत असतात.
शेतकरी वर्गाला आँनलाईन कामे करीत असताना अडचण निर्माण होत असतात.मात्र,अमोल राठोड हे ग्राहकांना विविध कामात येणाऱ्या अडचणींचा निराकरण करीत ते नेहमी मार्गदर्शन करीत असतात.हाच प्रामाणिक हेतू ठेवून ग्राहकांचा विश्वास जिंकत दिवसेंदिवस ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे.संयमाने योग्य दिशेकडे वाटचाल करण्यास ते यशस्वी ठरले आहे.ग्राहकांवर आपले सर्व काही भागभांडवल असते हे हित लक्षात घेवून त्यांनी सदैव ग्राहकांस परमोच्च स्थान दिले आहे.केसुला झेरॉक्स अँड जनरल स्टोअर्स ही दुकान बाजारपेठेत व्यवसायिक क्षेत्रात पुढे आली आणि ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरले.या दुकानात ग्राहकांना विविध प्रकारचे साहित्य माफक दरात मिळत असतात.परंतु ग्राहकांच्या साथीने व विश्वासाने हे सर्व साध्य झाले.दसरा,दिवाळी, नवरात्र अशा या सणाच्या दिवसी ग्राहकांची गर्दी असते.
संकल्पना- कुलदीप पवार