आपली बाजारपेठघनसावंगी तालुकाजालना जिल्हा
लंम्पी मुळे कुंभार पिंपळगाव येथील जनावरांचा बाजार बंद
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
स्थानिक प्रशासनाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्णय
महाष्ट्रातील १७ जिल्ह्यातील तालुक्यामध्ये जनावरांवर ‘लम्पी चर्मरोग नावांचा आजारांचा फैलाव झालेला आहे.जालना जिल्ह्यातही या आजारांचा शिरकाव झालेला आहे.बहुतांश ठिकाणी जनावरांचे नुमने हे पॉझिटिव्ह आढळून आलेले आहे.रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील दर बुधवारी भरला जाणारा जनावरांचा आठवडी बाजार बंद राहणार असल्याचा निर्णय येथील ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे.पुढील आदेशापर्यंत जनावरांचा बाजार बंद राहणार असल्याचे सरपंच शहाजानबी पठाण ग्रामविकास अधिकारी महादेव रूपनर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.