जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात आजपासून लागू झाली ही कलम.सभा, मिरवणूक, मोर्चास मनाई

            जालना, दि. 7  : – दि. 7 ऑक्टोबर 2021 ते दि. 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत नवरात्र उत्सव, तसेच दि. 19 ऑक्टोबर 2021 रोजी ईद-ए-मिलाद आणि कोजागिरी पोर्णिमा हे सण उत्सव संपुर्ण जालना जिल्ह्यात साजरा होणार आहे. जालना जिल्ह्यात विविध पक्ष, संघटनेच्या वतीने इतर मागण्या संदर्भात विविध राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने इतर मागण्या संदर्भात विविध राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने त्यांच्या विविध मागण्या संदर्भात धरणे, उपोषण, रास्ता रोको इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम अचानकपणे घेण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

images (60)
images (60)

      अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके, यांना प्राप्त अधिकारान्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3)अन्वये अधिकाराचा वापर करुन याद्ववारे पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केलेली आहे.

शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास, शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी, भाले, चाकू व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अहशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन, दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणरार नाही, वाद्य वाजविणार  नाही, गाणे म्हणणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप, विडंबनापर नकला करणार नाही सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजक माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा पत्रे किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

     हा आदेश कामावरील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागातील पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरीत्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागू होणार नाही.

   हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि. 6 ऑक्टोबर 2021 पासुन दि. 20 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहील.असे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांनी आदेशीत केले आहे.   

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!