अंबड येथील मत्स्योदरी देवीची यात्रा महोत्सव रद्द, दर्शन मात्र खुले
अनिल भालेकर/अंबड
मराठवाड्याचे आराध्य दैवत व जागृत देवस्थान म्हणून भक्तांच्या मनात अपार भक्ती भाव असणारे देवस्थान म्हणजे अंबड येथील मत्स्योदरी माता होय.
नवरात्र शारदीय उत्सव निमित्त मत्स्योदरी देवीची विधिवत शासकीय महापूजा संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार यांच्या हस्ते सपत्नीक मंत्रोच्चारात संपन्न झाली..
या वेळी उपस्थित पुजारी,ब्राह्मण व देवी संस्थानचे गोधली, संस्थानचे विश्वस्त वसंत कुंडूपंत बल्लाल, बाबासाहेब रघुनाथ कटारे, मंदिर संस्थानचे व्यवस्थापक कैलास शिंदे उपस्थित होते.
प्रशासनाच्या आदेशानुसार यात्रा रद्द करण्यात आली असली तरी भक्तांना कोरोना चे नियम पाळून देवीचे दर्शन घेता येणार आहे. स्थानिक अंबड पोलीस प्रशासन, सीआरपीएफ, गृहरक्षक दल, जिल्हा वाहतूक शाखा याचा चोख बंदोबस्त असल्याचे दिसून आले.मंदिर व पोलिस प्रशासनाच्या वतीने कोरोना नियमांबाबत काटेकोरपणे अमल करत असल्याचे दिसून आले.
भक्ताच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य पथक हि सज्ज असून मंदिर परिसर स्वच्छ रखण्या साठी मंदिर प्रशासन व नगर परिषद स्वच्छता कर्मचारी तयनात आहे