मंठा तालुका

कैलासचंद्र वाघमारे मंठा तालुक्याचे नवीन तहसीलदार

मंठा तहसीलदार सुमन मोरे
यांची पाथरीला बदली ..

images (60)
images (60)

तळणी : मंठा तहसीलच्या तहसीलदार श्रीमती सुमन मोरे यांची पाथरी ( जि. परभणी ) येथे बदली झाली असून त्यांच्या जागी बिलोली ( जि. नांदेड ) येथून कैलासचंद्र वाघमारे यांना पदस्थापना देण्यात आली आहे. महसूल मंत्रालयाने दि. ८ ऑक्टोबर रोजी त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.
मंठा तहसीलदार श्रीमती सुमन मोरे यांनी पुर्णा नदीपात्रातील आठ वाळु लिलाव व अवैध वाळुचोरी कारवाईतून तब्बल २० कोटींचा महसूल जमा केला. शासनाला सर्वाधिक महसूल देण्या-या तहसीलदार म्हणून प्रशासनात ओळख निर्माण केली . तर अतिवृष्टीतील पूरात व वीज पडून मृत्यू पावलेल्या दोन शेतकऱ्यांच्या कुटूंबाला आर्थिक मद्दत , अतिवृष्टीत मंठा तालुक्यातील ५९ हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाल्याच्या अहवाल वेळेत वरिष्ठांना देऊन जास्तीत जास्त शेतक-यांना मद्दत होईल व कोरोना काळात सर्सग वाढू नये , यासाठी प्रयत्न केले. रखडले शेत रस्त्याचे प्रश्न मार्गी काढले. तहसील कार्यालयात व सर्वसामान्यांची कामे कमी वेळेत करुन देण्यासाठी कायम तहसीलदार सुमन मोरे कायम आग्रही होत्या.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!