महाविकास आघाडीकडून आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

मुंबई
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने सारे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे. या बंदला आधी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, नंतर नरमाईची भूमिका घेत बंदला पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी जाहीर केले. मात्र, महाराष्ट्र बंदला भाजपने विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्र बंदला विरोध करणार असल्याचे रविवारी सकाळी स्पष्ट करणाऱ्या मुंबईतील व्यापाऱ्यांनी रविवारी रात्री मात्र बंदला पाठिंबा देण्याची घोषणा केली. शिवसेना आणि अन्य पक्षांच्या विनंतीनुसार आज पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा देण्यात येत असून, सायंकाळी 4 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी सांगितले.बंदसाठी राष्ट्रवादीनेही ताकद लावल्याने पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात सारे व्यवहार ठप्प होऊ शकतात. गावागावांमधील एकही दुकान उघडे राहाता कामा नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज, राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विविध नेते त्यात सहभागी होतील.
द
रम्यान, बंद यशस्वी होऊ नये म्हणून भाजपनेही प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपच्या विविध संघटना किंवा कामगार संघटनांनी व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.