तळणी बंद’ला अल्प प्रतिसाद …
तळणी : महाविकास आघाडीच्या वतीने ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंदकडे तळणीतील व्यापाऱ्यांनी दुर्लक्ष करीत दुकाने सुरु ठेवल्याचे दिसून आले.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतक-यांना भाजपाच्या मंत्रीपूत्राने वाहनाखाली चिरडले होते. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. तर या बंदला भाजपा व मनसेनी विरोध दर्शविला होता. तळणी बंद की सुरु या सर्दभात स्थानिक व्यापा-यात संभ्रम निर्माण झाला होता. या बंद बाबत महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना विश्वासात न घेतल्याने या बंदकडे तळणीतील व्यापाऱ्यांनी दुर्लक्ष केले. बाहेरुन येणा-या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली नसल्याने बंद होती. स्थानिक व्यापारी व महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या असमन्वयामुळे तळणी बंद अल्प प्रतिसाद दिसून आला.